एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव एकवटले असतानाच धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध भागात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. याच मागणीसाठी खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर हजारोच्या संख्येने धनगर समाज पुणे सातारा महामार्गावरबकरी मेंढरं व पारंपारिक वेशात रस्त्यावर उतरलेला आहे शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र भावना व्यक्त करताना दिसत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धनगर समाज बांधवांचा आरक्षणासाठी राज्य सरकारविरुद्ध एल्गार पाहायला मिळत आहे. आरक्षण देण्याच्या मागणीसाठी खंडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनगर बांधवांकडून आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलनात मेंढ्या आणि घोड्यांसह मोठ्या संख्येने धनगर बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलक पुणे – सातारा महामार्ग अडवला गेला असून या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन धनगरवाडीचे माजी उपसरपंच जिजाबा काळे यांनी केले आहे…यावरून हजारोच्या संख्येने धनगर बांधवसातारा जिल्ह्यातील खंडाळ्यामध्ये पुणे सातारा महामार्गावर उतरले आहेत