सातारा प्रतिनिधी
राज्यातील शिवप्रेमींना आणि ट्रेकर्सना भुरळ घालणारा तापोळा विभागातील वासोटा किल्ला पर्यटन हे आजपासून बंद करण्यात आले आहे.. पुढील पर्यटन हंगाम सुरू होण्याबाबत च्या सूचना पावसाळ्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे देण्यात येतील.. या कालावधीत वासोटा येथे प्रवेश बंद असून कोणी प्रवेश केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बामणोली वनक्षेत्रपाल बा.दी हसबनीस यांनी दिली आहे..