प्रतिनिधी / फोंडा
विठ्ठल नामाच्या गजरात फोंडा वारकरी मंडळाची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पायी वारीला 14 जूनपासून सुरुवात झाली. वरचाबाजार फोंडा येथील विठोबा मंदिर व वारखंडे येथील हनुमान मंदिरमध्ये विठ्ठल नामाचा गजर करून वारीला प्रारंभ झाला. यावेळी वारखंडेकर मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माशेल येथे एक रात्र मुक्काम करून वारी मेणकुरेला जाईल. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय मेणकुरे यांच्यासोबत 16 रोजी पंढरपूरला प्रस्थान करतील. चौदा दिवसानंतर 28 रोजी वारी पंढरपूरला दाखल होईल. 29 रोजी आषाढी एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन 30रोजी वारकरी फोंड्यात परतणार आहेत.