मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय बँकेने सर्व कालावधीच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा केली आहे. एमसीएलआर आधारीत कर्ज 0.10 टक्के इतके महाग होणार आहे. सदरचा नवा व्याजदर 15 एप्रिलपासून लागू झालेला असल्याचेही एसबीआयने म्हटले आहे. आता नवा एमसीएलआरप्रमाणे कर्जाचा 3 महिन्याकरीताचा नवा व्याजदर 6.65 ऐवजी 6.75 टक्के इतका असणार आहे. याचाच अर्थ ग्राहकांना आता पर्सनल, ऑटो व होम लोनकरीता जादा समान मासिक हप्ता भरण्याची तयारी करावी लागणार आहे.