विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साह, कोविड नियम पाळून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश
डिचोली/प्रतिनिधी
जून महिन्यात दरवषी सुरू होणाऱया शालेय वर्षाच्या परंपरेत खंड निर्माण झाल्यानंतर काल सोमवारी या 2022-23 या शालेय वर्षाचा शुभारंभ मोठय़ा उत्साहात झाला. गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे जून महिन्यात शाळा सुरू होऊ शकल्या नव्हत्या. यावषी जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहात परंपरेप्रमाणे शालेय वर्षाला प्रारंभ होणार असल्याने सर्व विद्यार्थी तसेच पालकांमध्ये एकच उत्साह दिसून येत होता. डिचोली तालुक्मयातील सर्व ठिकाणी शाळा हायस्कुलना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
डिचोली शहरातील शाळा-हायस्कुलमध्ये काल सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा मोठा गजबजाट पहायला मिळाला. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या विद्यावर्धक शिक्षण मंडळाच्या श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल, शिशुवाटीका, उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटाईझर घालून व मास्क परिधान करूनच विद्यार्थ्यांना आत घेण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन करणार : विजय सरदेसाई
या संस्थेच्या सर्व शिक्षण माध्यमातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आमची जबाबदारी असली तरी त्याबाबत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन केले आहे. गेल्या शालेय वर्षांत ऑफलाईन वर्ग भरविताना आम्ही काटेकोरपणे सर्व गोष्टी कोविड नियम पाळून केल्या होत्या. त्याच प्रमाणे यंदाही शालेय वर्षात सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही निभावणार, असे विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.
प्रत्येक शिक्षकाला मार्गदर्शन
शहरातील राधाकृष्ण विद्यालयातही विद्यार्थ्यांना कोविड नियमांचे पालन करण्याची सूचना दिली. शाळेचे नियम व सरकारतर्फे घातलेल्या बंधनांची सांगड घालताना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षकालाही मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार विद्यालयात वर्ग घेतले जाणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक चांदेलकर यांनी सांगितले.
सरकारी प्राथमिक केंद्र शाळेची इमारत सध्या बांधकाम अवस्थेत असल्याने शाळेचे वर्ग जुन्या पोलीस स्थानकात सुरू आहेत. या इमारतीत काल सर्व वर्ग भरले. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून कोविड मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली. पालकांनीही आपल्या लहान मुलांना शाळेत पाठविताना कोणत्या गोष्टी सांभाळाव्यात याचे मार्गदर्शन करण्यात आले.
डिचोली शहराप्रमाणेच तालुक्मयातील ग्रामीण भागातही शाळा-हायस्कुलांना मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. मुलांचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील रस्त्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यावरही जून महिन्यात दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे शाळांचे परिसर आणि रस्तेही सुखावले. सर्वत्र कोविड नियमांचे पालन करून वर्गाना प्रारंभ करण्यात आला.