प्रतिनिधी/ बेळगाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार दि. 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांचा रोडशो होणार असून बेळगावमधील नागरिकांना त्यांना पाहता यावे यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. कॉलेज रोड, रामलिंगखिंड गल्ली या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
नरेंद्र मोदी यांचा बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य रोड शो होणार आहे. होणारी गर्दी पाहता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. बॅरिकेड्सच्या पलीकडूनच नागरिकांना पंतप्रधानांना पाहता येईल. शनिवारी रामलिंगखिंड गल्ली येथे रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम करून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.