हलगा : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मोनाप्पा संताजी तर उपाध्यक्षपदी सुजाता कामाणाचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवार दि. 22 रोजी ही निवड प्रक्रिया झाली.
येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची 2022-25 या कालावधीसाठी निवड प्रक्रिया हलगा ग्रा.पं. सीएसी कमिटीच्या नेतृत्वाखाली झाली. या निवडणुकीसाठी सीएसी कमिटी अध्यक्षा रूपा सुतार, सदस्या रेखा चिक्कपराप्पा, भुजंग सालगुडे, सागर कामाणाचे, कल्पना हणमंताचे, चेतन कुरंगी उपस्थित होते.
अठरा जागांसाठी पालकवर्गाला निवड समितीमध्ये सदस्य होण्याची मुभा दिली होती. यामध्ये 18 जणांनीच उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये मोनाप्पा संताजी, सागर बिळगोजी, अनिल शिंदे, धाकलू बिळगोजी, पिराजी जाधव, संभाजी हणमंताचे, सुग्रीव कामती, बाळू कामती, प्रकाश बडस्कर, सुजाता कामाणाचे, सविता कालिंग, सुजाता संताजी, आशा संताजी, ज्योती संताजी, स्नेहल सामजी, अन्नपूर्णा शिंदे, गीता हणमंताचे, रेखा हणमंताचे आदींची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी मोनाप्पा संताजी व उपाध्यक्षपदी सुजाता कामाणाचे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्वांचे प्राथमिक मराठी शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी हलगा ग्रा. पं. अध्यक्ष सदानंद बिळगोजी, ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य गणपत मारिहाळकर, सीएसी कमिटीचे सदस्य, मुख्याध्यापक प्रकाश पाटील व शिक्षकवर्ग, पालकवर्ग उपस्थित होते.