न्हावेली / वार्ताहर
क्रीडा व युवक संचालनालय राज्य पुणे जिल्हास्तरीय क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा ७ रोजी ओरोस येथे संपन्न झाली. यामध्ये मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मधील 17 वर्षे वयोगटातील 40 किलो वजनी गटात कुमारी निधी चंद्रकांत राऊळ या विद्यार्थिनीचे जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याचप्रमाणे 14 वर्षे वयोगटात 30 किलो वजनी गटात कुमारी समृद्धी चंद्रकांत राऊळ द्वितीय क्रमांक प्राप्त केला कुमारी हर्षिता एकनाथ गावडे तिचे बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरीय निवड झाली या यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.
मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव श्री आर.आर. राऊळ,अध्यक्ष श्री शिवराम मळगावकर, खजिनदार श्री नंदकिशोर राऊळ स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ मुख्याध्यापक श्री फाले सर, पर्यवेक्षक श्री कदम सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.