विद्यापीठ निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान दुपारपर्यंतचे चित्र
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ निवडणूकीचा महत्वाचा टप्पा म्हणजे विविध अधिकार मंडळाच्या उमेदवारी अर्जांची छाननी आहे. सोमवारी छाननी प्रक्रिये दरम्यान दुपारपर्यंत अधिसभा शिक्षक मतदार संघात अनुसुचित जाती, जमातीमधून शिवाजी बोथीकर यांचा तर महिलांमधून शाहीन पटेल यांचे अर्ज पात्र असून इतर अर्ज अपात्र ठरले आहेत आहेत. त्यामुळे अधिसभा शिक्षक मतदार संघात या दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. हे दोन्ही उमेदवार सुटाचे असल्याने सुटाकडून आनंद व्यक्त होत आहे. परिणामी या मतदार संघात आठ जागांसाठी लढत होणार आहे.