आप्पाजी पाटील /खानापूर
खानापूर येथे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्dयानिमित्त खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात महान भारत केसरी सिकंदर शेख मोहोळ याने प्रतिस्पर्धी विशाल भोंडू हरियाणा केसरी याला तेराव्या मिनिटाला दुहेरीपट डावावर अस्मान दाखविले. हजारो कुस्तीशौकिनांच्या डोळ्dयांचे पारणे फिटले. आखाड्यात पहिल्या क्रमांकाची कुस्ती सिकंदर शेख मोहोळ विरुद्ध विशाल भोंडू हरियाणा यांच्यात रात्री सव्वानऊ वाजता लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील व भाजपचे संजय कुबल, प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, चांगाप्पा निलजकर, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे व कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्ही पैलवान तितक्याच ताकदीचे राहिल्याने सुरुवातीला आपापल्या डावपेचात अडकविण्याचा प्रयत्न केला. परंतु तेराव्या मिनिटाला सिकंदर शेखने यात बाजी मारली. पंच म्हणून कृष्णा पाटील व लक्ष्मण बामणे यांनी काम पाहिले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती सुनील फडतरे मुधोळ विरुद्ध संदीप मोटे सांगली यांच्यात खानापूर कुस्ती संघटनेच्यावतीने लावण्यात आली. यात संदीप मोटे यांनी पोकळ घिस्सा डावावर पंधराव्या मिनिटाला विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक काटे दावणगिरी याने प्रतिस्पर्धी लक्ष्मण डागर दिल्ली याच्यावर एकलांगी डावावर विजय मिळविला. आखाड्याचे उद्घाटन लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान फोटो पूजन भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते झाले. यावेळी महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक चांगाप्पा निलजकर, जनरल मॅनेजर तुकाराम हुंद्रे, माजी आमदार अरविंद पाटील, खानापूर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, कार्याध्यक्ष जयवंत खानापूरकर, सेक्रेटरी शंकर पाटील, कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी, भाजपचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मेंढ्याची कुस्ती पंकज चापगाव विरुद्ध महेश तीर्थकुंडये यांच्यात झाली. खानापूर पीकेपीएसचे संचालक सुरेश सुळकर यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. यात महेश तीर्थकुंडये पॉईंटवर विजयी झाला.
या आखाड्यात पैलवान मनिषकुमार दिल्ली, कामेश कंग्राळी, रोहित कंग्राळी, हणमंत इंगळगी, पवन चिकदिनकोप, राजू गंदिगवाड, पार्थ कंग्राळी, विनायक बेकवाड, प्रेम जाधव, दर्शन कंग्राळी, मुबारक गंदिगवाड, वैष्णव कुद्रेमनी, राजू शिनोळी, पिसीलिंग बिडी, हणमंत उचवडे, सतीश संतिबस्तवाड, श्रीनाथ बेळगुंदी, समीर रणकुंडये, किरण मच्छे, विश्वास बेळगुंदी, हर्षवर्धन साके, शरद पाटील, आदिनाथ चापगाव, स्वप्निल सावगाव आदींनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. आखाड्यातील 55 कुस्त्यांपैकी 4 कुस्त्या बरोबरीत सुटल्या. तर अन्य सर्व कुस्त्या निकाली झाल्याने हजारो कुस्ती शौकिनांच्या डोळ्dयांचे पारणे फिटले. पंच म्हणून कृष्णा पाटील, हणमंत पाटील, बाळाराम पाटील, यशवंत अल्लोळकर, विठ्ठल अडकुरकर, पांडुरंग पाटील, रामचंद्र पाटील, राजाराम गुरव, मधु पाटील, रुद्रापा हेंडोरी, निवृत्ती पाटील, प्रकाश तीर्थकुंडये, शिवाजी मंडोळकर, बाबू कल्लेहोळकर, मारुती तुळजाई, विश्वनाथ पाटील, कृष्णा पाटील, बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, हणमंत गुरव, सुरेश सुळकर, लक्ष्मण पाटील यांनी केले. कुस्त्यांचे समालोचन कृष्णा चौगुले, शंकर पाटील, प्रकाश मजगावी, मल्लाप्पा मारिहाळ यांनी केले. आखाड्यात माजी आमदार अरविंद पाटील, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, भाजपचे नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, शंकर पाटील, राजेश मडवाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या आखाड्यात आमदार विठ्ठल हलगेकर यांचा सत्कार करण्यात येणार होता. पण ते परगावी असल्याने यावेळी वेळेत पोहोचू शकले नाहीत. परंतु त्यांनी कुस्ती संघटनेला आपल्या शुभेच्छा पाठविल्या व सर्वांचे आभार मानले.