Sindhudurg BJP welcomed Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
सिंधुदुर्ग भाजप तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी लोकसंख्येच्या आधारावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नियोजन मंडळासाठी मंडळासाठी मिळणाऱ्या निधीत तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांनी कात्री लावल्याचे नार्वेकर यांच्या लक्षात आणून दिले. निधी पूर्ववाद मिळावा अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्गचा चीपी विमानतळ बंद पडणार आहे, त्यामुळे मोपा विमानतळ होण्यापूर्वी सिंधुदुर्ग विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी राणे यांनी केली .
यासंदर्भात विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक देण्याची मागणी राणे यांनी नार्वेकर यांच्याकडे केली. नार्वेकर यांनी अशी बैठक घेण्याचे मान्य केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आंबोली कबुलायतदार गावकर प्रश्नसंदर्भातही नार्वेकर यांचे लक्ष वेधले. नार्वेकर यांनी महसूल मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.