सुवा
सित्विनी राबुका यांनी शनिवारी फिजीच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या शपथविधीचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सुवा येथील फिजीयन संसदेच्या बैठकीत प्रँक बैनीमारमा यांच्यावर राबुका यांनी मात करत नामांकन जिंकले. पीपल्स अलायन्स पक्षाचे प्रमुख राबुका यांनी गेल्या आठवडय़ात विजय मिळवला होता. त्यानंतर अन्य दोन पक्षांच्या साथीने त्यांनी बहुमताची आघाडी तयार केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिजीच्या नवनिर्वाचित पंतप्रधान सित्विनी राबुका यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि फिजीमधील घनि÷ आणि दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.