नवी दिल्ली :
भाजप किसान मोर्चाचे नेते सुरेंद्र मतियाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. 14 एप्रिल रोजी द्वारकाच्या बिंदापूर भागात मतियाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घटनेच्या वेळी ते आपल्या कार्यालयात बसले होते.
हत्या प्रकरणात अटक केलेल्यांपैकी एकाचे नाव योगेश (30) असे असून तो हरियाणातील झज्जर जिह्यातील रहिवासी असल्याचे उपायुक्त एम. हर्षवर्धन यांनी सांगितले. त्याच्या ताब्यातून एक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. अन्य पाच जणांवर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारा फरारी गुंड कपिल सांगवान याच्याशी संबंधित होता.