सावळज, वार्ताहर
सावळज (ता. तासगाव) येथील कु. प्रांजल प्रमोद माळी (वय -८) या मुलीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी रात्रीच्या ११ च्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला.मात्र सर्पदंश झाल्याची तीला लवकर जाणीव झाली नाही.मात्र काही वेळाने त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी सावळज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु प्रांजल अधिकच अत्यावस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. दरम्यान, उपचारापूर्वीच प्रांजलची प्राणज्योत मालवली.
सावज येथील एस. के म्हणून इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या धाडसी प्रांजलच्या मृत्यूची बातमी सावळजमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मृत्यूमुळे सावळज गाव शोकाकुल झाले आहे. लहान वयाच्या मुलीचा सर्पदंशाने झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.