ऑस्ट्रियाच्या संशोधकांचा दावा ः लवकर बंदी घालण्याची मागणी
सोशल मीडियाचा प्रभाव मुलांच्या आरोग्यावरही पडत असल्याचा दावा ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथील मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आरोग्य संशोधकांनी केला आहे. जर मुले जंक फुडला अधिक पसंत करत असल्यास यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जबाबदार असू शकतात. सोशल मीडियावर लोकप्रिय लोकांच्या तीन-चतुर्थांश पोस्ट जंक फुडशी संबंधित आहेत. याचा थेट प्रभाव मुलांच्या आरोग्यावर पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संशोधकांनी 13 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लोकप्रिय जर्मनीच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या पोस्टचे विश्लेषण केले. या इन्फ्लुएंसर्सच्या सोशल मीडियामध्ये 3.5 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्फ्लुएंसर्सच्या 75 टक्क पोस्ट खाण्या-पिण्याच्या गोष्टींवरुन असल्याचे संशोधकांना आढळून आले.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स मुलांच्या खाण्याच्या सवयीला प्रभावित करत आहेत, त्यांना स्थुलत्वाचे शिकार करत आहेत. मुलांच्या स्थुलत्वाला रोखण्यासाठी सरकारने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सच्या खाण्यापिण्याच्या कंटेंटवर बंदी घालावी असे संशोधकांचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रियन तज्ञांनी 6 जर्मन भाषिक इन्फ्लुएंसर्सचे फॉलोअर्स आणि त्यांच्या 364 पोस्टचे विश्लेषण केले. यात एकूण 13 तासांच्या व्हिडिओ फुटेज सामील आहे. 409 प्रकारच्या उत्पादनांविषयी सामग्री पोस्ट करण्यात आली आहे. 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये लोकप्रिय टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि युटय़ूबवरील हे इन्फ्लुएंसर्स जंक फुडसह चॉकलेट आणि मिठाई यासारख्या उत्पादनांचे प्रमोश करत नसल्याचे संशोधनात दिसून आले आहे.