विधान परिषद उपसभापती डॉ. निलमताई गोरे
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
प्रत्येक गावात काही बेवडे असतात व ते सातत्याने गोंधळ घालून लोकांचे लक्ष विचलित करतात. त्या प्रमाणे विरोध मंडळी कायम गोंधळ घालत आहेत. मुंबईत ही जबाबदारी भाजपने दोघांवर सोपविली असून मिडीयावर सतत त्यांच्या मर्कटउडय़ा सुरू असतात. त्यामध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे याची पोटदुखी काही उपाय केले तरी बंद होत नाहीत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नीवर घाणेरडे आरोप करणाऱया व्यक्तीकडून आपण काय अपेक्षा ठेवणार असा टोलाही डॉ. निलमताई गोरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
महाबळ्sश्वसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 100 कोटींचा निधी मंजूर केला असून या पैकी 50 टक्के निधी पालिकेकडे वर्ग देखिल केला आहे. या आराखडयाच्या कामाच्या भुमिपूजनासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे लवकरच महाबळेश्वर येथे येणार आहेत. हा नियोजीत दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱयांची एक महत्वाची बैठक विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृह येथे पार पडली यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक मंत्री महोदयांनी महाबळेश्वरसाठी मोठा निधी दिला आहे. सातारा जिह्यात आपले आमदार कमी आहेत, शिवाय खासदारही नाही, त्यामुळे शिवसेनेच्या कामाचे श्रेय इतर मंडळी घेऊ शकतात. या साठी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियोजित दौरयाच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी गावा गावात बैठकांचे सत्र सुरू करा. सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत, या योजना लोकांपर्यत पोहचवा. सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चांगले केलेले काम विरोधकांना दिसत नाही, ते नको तो विषय काढून मुख्यमंत्र्याची बदनामी करीत सुटले आहेत. असे उपसभापती डॉ. निलमताई गोरे यांनी सांगितले.
या वेळी माजी आमदार दगडुदादा सपकाळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, युवासेना जिल्हा प्रमुख रणजितसिह भोसले, उपजिल्हा प्रमुख संजय मोहीते, उपल्हा प्रमुख सचिन वागदरे, तालुका प्रमुख संतोष जाधव, संजय शेलार, राजश्री भिसे, वनीता जाधव, लिलाताई शिंदे, गणेश उतेकर, जितेंद्र सपकाळ, शिवसेना शहर प्रमुख महेश गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे महाबळेश्वरवर नितांत प्रेम होते असेच प्रेम आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखिल आहे. या प्रेमापोटी त्यांनी महाबळेश्वरसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. भूमिपुजन सोहळा शिवसेनेला साजेसा भव्य दिमाखदार व वैभवशाली झाला पाहीजे. शहराच्या प्रवेश व्दारावर स्व. बाळासाहेब ठाकरे चौक आहे, या चौकात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सुंदर व पर्यटन स्थळाच्या सौंदर्यात भर घालणारे स्मारक व्हावे, अशी मागणी नितीन बानुगडे पाटील यांनी केली.