तीन दिवसांत 9 हजार रोपांची विक्री : साडेपाच लाखाचे उत्पन्न
प्रतिनिधी /बेळगाव
पर्यावरण आणि निसर्गप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी बागायत खात्यामार्फत भरविण्यात आलेल्या रोपबाजाराला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांत 9 हजार रोपांची विक्री झाली असून यातून तब्बल साडेपाच लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवषी रोपविक्रीतून साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत यंदा दोन लाखांचे अधिक उत्पन्न मिळाले आहे.
बागायत खात्यामार्फत दरवषी क्लब रोड येथील हय़ूमपार्क येथे रोपबाजाराचे आयोजन करण्यात येते. गत दोन वर्षात कोरोनामुळे बाजाराला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या बाजारात फणस, आंबा, चिकू, सीताफळ, काजू, पेरू, लिंबू यासह गुलाब, पाम, जास्वंद, मोगरा, कुट्रॉन्स आदी रोपांची विक्री झाली.
शोभिवंत रोपेही अधिक प्रमाणात विकली गेली. पावसाला प्रारंभ झाल्याने रोपलागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रोप खरेदीला नागरिकांनी पसंती दिली. शिवाय शोभिवंत रोपटय़ांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे फळ रोपांच्या तुलनेत पुष्प आणि शोभिवंत रोपटय़ांची विक्री अधिक प्रमाणात झाली.
कृत्रिम मध उत्पादनाचे मार्गदर्शन
बागायत खाते बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत आहे. नुकताच आंबा महोत्सव भरवून आंबाप्रेमींना प्रोत्साहन दिले आहे. त्यापाठोपाठ रोपबाजाराचे आयोजन करून निसर्गप्रेमींना प्रोत्साहित केले आहे. याबरोबरच या बाजारात अळंबी आणि कृत्रिमरीत्या मध उत्पादन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय अळंबी आणि मधाची विक्री करण्यात आली. त्याबरोबर सेंद्रिय खते उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱयांनी या बाजाराला भेट दिली.
पुढील वषी रोपांची संख्या वाढविणार
यंदाच्या रोपबाजाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे दुसऱयाच दिवशी उच्चांकी रोपांची विक्री झाली होती. त्यानंतर पुन्हा रोपे मागविण्यात आली होती. तीन दिवसांत साडेपाच लाखांहून अधिक किमतीच्या रोपांची विक्री झाली आहे. पुढील वषी रोपांची संख्या वाढविली जाणार आहे. याबरोबरच अळंबी आणि मध उत्पादनासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– महांतेश मुरगोड, उपनिर्देशक, बागायत खाते