Spontaneous response to urgent blood donation camp in Sawantwadi
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे आयोजन
सावंतवाडी रक्तपेढीमध्ये भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी सावंतवाडी रक्तपेढीने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला रक्तदान शिबीरासाठी आवाहन करताच तात्काळ आयोजित करण्यात आलेल्या अत्यावश्यक रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद लाभला. अवघ्या दोन दिवसात नियोजन करण्यात आलेल्या या शिबिरात महिलांसह नियमित तसेच तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी सावंतवाडीच्याकाॅटेज हाॅस्पिटलचे बालरोगतज्ञ डाॅ. संदीप सावंत, रक्तपेढीच्या प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, लॅब टेक्निशियन सौदागर, सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
यावेळी माजगाव येथील शहीद दिपक सावंत यांचे बावीस वर्षीय चिरंजीव कु. यज्ञेश दिपक सावंत तसेच शुभम रावजी घावरे (सावंतवाडी) या युवकांनी प्रथमच रक्तदान केले. तर अनिकेत सावंत (माजगांव), नेल्सन मिनेझीस, शंकर धुरी, उमेश कालकुंद्रीकर, अमृता धुरी (सर्व सावंतवाडी), रोहन सावंत (सांगेली), गौरेश गवंडी (बांदा), प्रसाद सावंत (इन्सुली), अक्षता आमडोसकर (शेर्ले), कन्हैया मयेकर, प्रसाद सावंंत, अमोल परब, निलेश गवंडे (सर्व ओटवणे) आदींनी रक्तदान केले.
ओटवणे प्रतिनिधी