प्रतिनिधी /पणजी
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पणजी जिमखानाची पहाणी करून अतिक्रमण केलेली क्रीडाखात्याची जागा पुन्हा ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी पुन्हा त्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
गावडे यांनी केलेल्या पहाणी-तपासणीत पणजी जिमखान्याने हजारो चौ. मी. जमीन बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. सरकारी सर्वेक्षणामार्फत त्या जागेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.