आंतर कॉलेज हॉकी स्पर्धेत मुला-मुलींच्या 11 संघांचा समावेश
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित सिक्स ए साईड आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेला मोठय़ा उत्साहात सुरूवात झाली.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रणजित मंन्नोळकर, हॉकी संघटनेचे सचिव साकिब बेपारी, एन. बी. नदाफ, खालीक बेपारी, प्रकाश हळदणकर, गोपाळ खांडे, सुरेश खन्नूकर, अशोक अष्टेकर, गणपत कडोलकर, राजेश मोटीबन्नूर, उत्तम शिंदे, जे. ए. जागिरदार, प्रशांत मनकळी, इकबाल बॉम्बेवाले, सादीक जमादार आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते उपस्थित संघांची ओळख करून घेतल्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या 6 संघांनी तर मुलींच्या सात संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीचे सामने सोमवारी खेळविण्यात येणार आहेत.