राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. यामध्ये गृह, अर्थ आणि जलसंपदा हे खाते त्यांच्याकडे देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, परिवहन, मदत व पुर्नवसन खातं देण्यात आले आहे.
कोणाला कोणती मिळाली खाते
चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण खाते, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य
राधाकृष्ण विखे-पाटील -महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
डॉ. विजयकुमार गावित-आदिवासी विकास
गिरीष महाजन-ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे-बंदरे व खनिकर्म
संजय राठोड-अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे-कामगार
संदीपान भुमरे-रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत-उद्योग
प्रा.तानाजी सावंत-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार-कृषी
दीपक केसरकर-शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे-सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई-राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा-पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
Previous Articleघरोघरी तिरंगा फडकावून उस्फुर्त प्रतिसाद
Next Article दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.