वारणानगर ,प्रतिनिधी
पन्हाळगडाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाघबीळ येथील फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी,पन्हाळा येथे शनिवार दि.२६ रोजी राज्यस्तरीय
आईसस्टॉक स्पर्धेला प्रारंभ होणार असून, या स्पर्धेसाठी तीस जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा कोल्हापूर
जिल्ह्यात प्रथमच होत असून क्रिडा प्रेमीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यानी केले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १२ वा. खासदार धैर्यशिल माने यांच्या हस्ते व प्रांताधिकारी समिर शिंगटे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर रविवार दि.२७ रोजी दुपारी ५ वा . बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते तसेच एन्थी ग्रुप शिक्षण समूहाचे संचालक सर्जेराव माथुगडे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.आईसस्टॉक हा खेळ विंटर ऑलिंपिक मधील खेळ असून हा खेळ बर्फावर तसेच सपाट जमिनीवर सुद्धा खेळला जातो.यामध्ये पुढे लक्ष असते तेथे आपण अचूक पध्दतीने स्टॉक पोहचवावा लागतो. हा खेळ वैयक्तीक व सांघीक अशा सात प्रकारामध्ये खेळला जातो.
भारतामध्ये आईसस्टॉक या खेळाची सुरूवात २०१४ मध्ये महमद ईकबाल याने केली. तसेच इंडीयन आईसस्टॉक फेडरेशनची स्थापना करण्यात आली. अतिशय कमी वेळातच हा खेळ खेलो इंडीया विंटर गेम तसेच अखील भारतीय पोलीस खेळामध्ये समाविष्ट झाला. आपल्या देशातून बरेच खेळाडू अंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपली चमक दाखवीत आहेत. महाराष्ट्र आईसस्टॉक संघटनेची सुरूवात महेश राठोड यांच्या प्रयत्नाने २०२१ मध्ये झाली. आणि थोड्याच कालावधीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी देशभरात आपला दबदबा कायम ठेवला. तसेच मागील वर्षी इटली येथे झालेल्या जागतीक आईसस्टॉक स्पर्धेमध्ये आपल्या राज्याचे दोन खेळाडू . यश सरनाईक व प्रविणसिंह कोळी यांनी सहभाग घेतला आणि जागतीक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर राहीले.आज महाराष्ट्रामधे हा खेळ तीस पेक्षा जास्त जिल्हयांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो व दिवसेंदिवस यामध्ये खेळाडू उत्साहाने सहभागी होत आहेत असे संघटनेचे अध्यक्ष महेश राठोड यानी सांगीतले.