व्यावसायिक निर्मिती लवकरच
इस्रायलमध्ये एक आठवड्यापासून सुरू असलेल्या फ्लाइंग टॅक्सीची अनेक परीक्षणं यशस्वी ठरली आहेत. एकूण 11 कंपन्यांनी मिळून ही परीक्षणं एकाच ठिकाणी केली आहेत. यादरम्यान वाळवंटापासून दऱ्याखोऱ्यांदरम्यान देखील या ड्रोन टॅक्सींनी उड्डाण केले आहे.
यातील एका फ्लाइंग टॅक्सीने 220 किलोग्रॅम वजन वाहून नेत 30 किलोमीटरपर्यंतचे उड्डाण केले, यातून दोन जणांनी प्रवास केली आहे. दोन वर्षात या फ्लाइंग टॅक्सींचे व्यावसायिक उत्पादन सुरू होणार असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. इस्रायलने सुमारे 3 वर्षांपूर्वी नॅशनल ड्रोन इनिशिएटिव्ह प्रोग्राम सुरू केला होता. याच्या अंतर्गत देशातील 11 कंपन्यांना एका व्यासपीठावर येत फ्लाइंग किंवा ड्रोन टॅक्सी निर्माण करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते.
एव्हिएशन तज्ञांनी याला ‘इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग’ नाव दिले आहे. याचे परीक्षण यशस्वी ठरल्यावर विविध डिझाइन्स आणि क्षमता असलेल्या फ्लाइंग टॅक्सी निर्माण करण्यावर लक्ष पेंद्रीत करण्यात आले.
इस्रायलच्या कंपन्या फ्लाइंग टॅक्सीच्या निर्मितीदरम्यान सुरक्षा अन् जागतिक निकषांची खबरदारी घेत आहेत. प्रथम छोट्या कार्गो फ्लाइट्स ऑपरेट करण्यात आल्या आहेत. आता पॅसेंजर फ्लाइट परीक्षण देखील यशस्वी ठरले आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत 16 लाख डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत.
3 वर्षांमध्ये या फ्लाइंग टॅक्सीच्या 19 हजारांहून अधिक फ्लाइट्स संचालित करण्यात आल्या. शहरी अन् ग्रामीण भागालाही यात सामील करण्यात आले हेत. याचे तंत्रज्ञान सध्या अत्यंत गुप्त ठेवण्यात आले आहे. या फ्लाइंग टॅक्सींना कुठल्याही जहाजावरूनही ऑपरेट करता येणार आहे. तसेच त्या रात्रीच्या वेळी देखील सहजपणे टेकऑफ आणि लँडिंग करू शकणार आहेत.