वारणानगर / प्रतिनिधी
Kolhapur Crime News : कोडोली (ता. पन्हाळा) येथील आझाद गल्लीत परप्रातिय तरुणाने दारूच्या नशेत राहत्या घरात किचन मध्ये स्लॅपच्या हुकस गळफास लावून आत्महत्या केली. राजेश रामकरण बैस (वय २५) रा.मुळ नैकीन,सींधी,मध्यप्रदेश असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीसात झाली असून या बाबतची वर्दी त्याच्या पत्नीने पोलीसात दिली आहे.
याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की, राजेश हा जेसीपीचा चालक म्हणून काम करीत होता.कोडोलीत तो भाड्याने राहत होता त्याला दारूचे व्यसन होते. काल सोमवार (दि.१९) रोजी त्याने दारूच्या नशेत दीड वाजण्याच्या सुमारास घरात कोण नसल्याचे पाहुण आत्महत्या केली.शेजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने कोडोली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी तो मृत्यू झाल्याचे सांगितले.