औंध / प्रतिनिधी :
ऑलिम्पिक पदक विजेत्या व जागतिक पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष यांचेवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. महिला कुस्तीगिरांनी उभा केलेल्या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय कुस्तीगीर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
आज पुणे येथे सह्याद्री कुस्ती संकुल (वारजे) येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या विशेष कार्यकारणी व विशेष सर्वसाधारण सभा खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अर्जूनवीर काकासाहेब पवार प्रा. बंकट यादव ४० जिल्हा / शहर तालीम संघाचे प्रतिनिधींनी उपस्थित होते.सभेच्या सुरवातीला अध्यक्ष पवार यांनी मुबई उच्च न्यायालयाचा निकाल कुस्तीगीर परिषदेच्या बाजूने असून परिषदेचे अधिकार आबाधित आहेत. निकाल त्यांनी सभागृहास वाचन करून दाखवू निकालाबद्दल सभागृहास माहिती दिली. परिषदेच्या विशेष कार्यकारणी व विशेष सर्वसाधारण सभेत पुढीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये यापुढे महिला समिती स्थापन करण्यात येणार आहे. महिला समिती मध्ये आजी माजी आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर, प्रशिक्षक, पंच कायदेशीर सल्लागार यांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद १९५३ सालापासून राज्यातील पैलवानांच्या प्रगती साठी कार्यरत आहे. परिषदेचे अस्थित्व काही कारणास्तव धोक्यात येत असल्यास महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आपल्या न्याय हक्कासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. परिषदचे सर्व मान्यताप्राप्त जिल्हा तालीम संघ , प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यानी ठाम पणे कुस्तीगीर परिषदेबरोबर राहून कुस्तीगीर परिषदेची मान्यता आबादित राहण्यासाठी प्रयत्नशील करण्याचा निर्णय घेण्यात आला. .
उस्मानाबाद जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सभागृहात मागणी केली. चालू वर्षातील परिषदेकडून आयोजित होणाऱ्या (महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, ग्रीको रोमन, कुमार मुले, मुली) वेगवेगळ्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सर्व संलग्न इच्छुक जिल्हा / शहर तालीम संघ व प्रयोजकांकडून स्पर्धा आयोजनाची मागणी परिषदेस करण्यात यावी असे सभागृहात ठरवण्यात आले. स्पर्धा आयोजनासाठी अजून कुणाची मागणी परिषदेकडे आल्यास पुढील कार्यकारणी सभेत निर्णय घेऊन परिषदेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.