नवी दिल्ली
मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिंघल यांना 1 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. झारखंडमधील मनरेगा घोटाळय़ाप्रकरणी ईडीने सिंघल यांना अटक केली होती. सिंघल यांच्या सीएच्या कार्यालयावर छापा टाकत ईडीने 19 कोटी रुपये जप्त केले होते. अंतरिम जामिनाच्या अटीनुसार सिंघल यांना दिल्लीतच रहावे लागणार आहे.