प्रतिनिधी / पणजी
विदेशी कंपनीत परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेक युवकांना लाखो ऊपयांना गंडा घालणाऱ्या एका संशयीताला ओल्ड गोवा पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याच्या विरोधात भादंसं 406 व 420 कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला ट्रांजीस्ट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले आहे. याबाबत चिंबल तीसवाडी येथील मयुर कुंकळीकर यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयीताचे नाव अनिकेत बाळचंद गायकवाड (25 माजळनगर, अहमदनगर महाराष्ट्र) असे आहे. संशयीताने नोव्हेंबर 2022 ते फ्रेब्रूवारी 2023 या कालावधीत अनेक युवकांकडून परदेशात नोकरीचे आमीष दाखवून पैसे घेतले होते. तक्रारदार मयुर कुंकळकर याला विदेशी कंपनीच्या जहाजावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून 13 लाख ऊपये घएतले होते.
संशयीत अनिकेत याने खोर्ली तीसवाडी येथील सावीयो सिलॅस टोलेन्टीनो द सिल्वा या युवकाला हाताशी धरले आणि त्याच्या मार्फत गोव्यातील युवकांना विदेशातील नोकरीची भुरळ घातली. विदेशात नोकरी मिळणार या आशेने अनेक युवकांनी कर्ज काडून तसेच नातेवाईकांकडून पैसे आणून संशयीताला दिले होते. संशयीताने या युवकांकडून सर्व कागपत्रे तसेच फोटो घेऊन प्राथमिक प्रशिक्षणासाठी तसेच कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी मुंबईत बोलाविले होते. मात्र शेवटपर्यंत परदेशात नोकरी दिलीच नाही.
अनेक दिवस झाले तरी नोकरीचा पत्ता नसल्यामुळे ज्या युवकांनी पैसे दिले होते त्यांना फसवणूक होत असल्याचा संशय आला आणि त्यांनी पैसे परत मागायला सुऊवात केली होती. सुऊवातीला संशयीताने पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र नंतर त्याने फोन घेणे बंद केले तर काहीवेळा त्याचा फोन बंद येऊ लागला होता. ज्या ठिकाणचा पत्ता त्याने दिला होता त्या ठिकाणी संश्यीत मिळत नसल्याने मयुर कुंकळकर यांनी ओल्ड गोवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
ओल्ड गोवा पोलिसांनी फोंडा, मडगाव व अन्य ठिकाणी संशयीताचा शोधे घेतला मात्र तो मिळत नसल्याचे आढळून आले होते. संशयीताच फोन ट्रॅकींगवर घातला असता तो मुंबईत असल्याचे आढळून आले ओल्डा गोवा पोलिसांनी त्वरीत मुंबई गाठली व मुंबई पोलिसांच्या सहकर्याने संशयीताला अटक केली. त्याला गोव्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने शंभरहून अधिक युवकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहे. ओल्ड गोवा पोलीस स्तानकाच्या महिला उपनिरीक्षक लॉरीन सिक्वेरा, कॉन्स्टेबल निलेश साखळकर, गितेश गावस, व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.