पेडणे पोलिसांची लुधियाना पंजाब येथे कारवाई
पेडणे : जुनसवाडा मांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये बेकायदा घुसून त्यातील एकूण 80 हजार ऊपये रोख आणि तीन मोबाईल फोन चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी पंजाब लुधियाना येथील राहुल रामतीर्थ यादव (22) या युवकाला अटक करण्यात आली आहे. पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 2 फेब्रुवारी रोजी जुनसवाडा येथील येथील एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत संशयिताने ऊममधील तीन मोबाईल आणि रोख ऊ. 80 हजार मिळून 1 लाख 40 हजारांचा माल लंपास केला. या चोरीप्रकरणी पेडणे पोलिसांनी शोध मोहीम राबवत लुधियाना पंजाब येथे जाऊन संशयित राहुल रामतीर्थ यादव याच्या मुसक्या आवळल्या.
महिला पोलीस उपनिरीक्षक सुमेधा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सागर खोर्जुवेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती हरमलकर, असिस्टंट हेड कॉन्स्टेबल हरिश्चंद्र पालयेकर, विष्णू, कॉन्स्टेबल सागर नाईक, बाबतीस मास्करान्हीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलीस उपधीक्षक राजेश कुमार आणि पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.