घाम एकप्रकारे अँटीबायोटिक ज्यूस, शरीरात बॅक्टेरियाशी लढण्याचे कार्य
तुम्ही घामाच्या दुर्गंधीने त्रस्त असाल, लोक तुमच्यापासून दूर राहत असतील तर हा घाम आणि त्याचा वास दोन्ही तुमच्यासाठी उपयुक्त असल्याचे जाणून घ्या. घाम तुम्हाला हायड्रेटच ठेवत नाही, तर त्वचेच्या अनेक आजारांपासून वाचतो. आमच्या त्वचेवर 200 हून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया असतात.
घाम येऊ लागल्यावर हे बॅक्टेरिया सक्रीय होता. घामाला स्वतःचा असा कुठलाही गंध नसतो, परंतु काखेत अन् जांघांमधून निघणाऱया घामात, तेल, फॅट अन् प्रोटीन असते. काही विशेष प्रकारचे बॅक्टेरिया तेथे अधिक सक्रीय होत असतात. याचमुळे तेथून दुर्गंध येऊ लागतो, परंतु हे बॅक्टेरिया एक्झिमा यासारख्या आजारांपासून वाचवत असतात. घाम एमआरएसए सारख्या आजारांनाही दूर ठेवत असतो. याचे बॅक्टेरिया सर्वसाधारणपणे रुग्णालय परिसरात आढळून येतात. अमेरिकेतील मोठी लोकसंख्या या आजाराने त्रस्त आहे.
घामातील दुर्गंध आमच्या शरीरावरील बॅक्टेरियामुळे निर्माण होत असतो. हे बॅक्टेरिया घामातील मॉलिक्यूलचे ग्रहण करतात, यामुळे अन्य मॉलिक्यूल तयार होतात, त्यांचा वेगवेगळा गंध असतो असे उद्गार न्यूयॉर्क विद्यापीठातील बायोलॉजिस्ट गेविन थॉमस यांनी काढले आहेत.
आमचा घाम हा एकप्रकारे अँटीबायोजिक ज्यूस आहे, जो हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यासाठी एक भिंत तयार करतो. अँटीबॅक्टेरियल साबणाने आंघोळ केल्यावरही हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरावर असतात. आंघोळ केल्याच्या 10 मिनिटातच हे तयार होतात आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवत असतात अशी माहिती डर्मिटलॉजिस्ट रिचर्ड गॅलो यांनी दिली आहे.