40 वर्षांपासून वाढवतेय केस, गिनिज बुकमध्ये नाव नोंद
फ्लोरिडाच्या क्लेरमोंटमधील एका 60 वर्षीय महिलेने 2009 साली सर्वात लांब केसांचा विक्रम नोंदविला होता. हा विक्रम आता अधिकच मजबूत झाला आहे. कुणीही हा विक्रम आजवर मोडू शकलेला नाही. आशा मंडेला यांच्या नावावर सर्वाधिक लांब केसांचा विक्रम आहे. 11 नोव्हेंबर 2009 रोजी आशा यांच्या केसांची लांबी 5.96 मीटर (19 फूट 6.5 इंच) इतकी होती. आता हे प्रमाण वाढून 33.5 मीटरपर्यंत पोहोचली आहे. त्रिनिदाद अन् टोबॅगो बेटावरून न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर आशा यांनी 40 वर्षांपूर्वी स्वतःच्या केसांना वाढविण्यास सुरुवात केली होती.
आशा यांच्या केसांचे वजन 19 किलो इतके आहे. मी माझ्या प्रेमळ केसांना स्वतःचा रॉयल क्राउन किंवा कोबरा म्हणेन. झोपण्यापूर्वी मी माझ्या केसांना कुठल्यातरी गोष्टीशी बांधून ठेवते असे आशा यांनी म्हटले आहे. आशा यांचे पती इमॅन्युएल चेगे हे केनियाची राजधानी नैरोबी येथे एक हेअर स्टायलिस्ट आहेत. इमॅन्युएल हेच आशा यांच्या केसांची पूर्ण निगा राखतात.
इमॅन्युएल अन् आशा हे परस्परांना प्रथम ऑनलाईन भेटले होते. त्यांनी आशाचे छायाचित्र कुठल्यातरी वेबसाइटवर पाहिले होते. परस्परांना भेटल्याच्या एक वर्षाने दोघांनी विवाह केला. आशा यांच्या केसांना धुण्यापासून सुकविण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया दोन दिवस चालते. आशा या सध्या हेअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय करतात. ‘चंकी’ लॉक्स किंवा छोटय़ा बोटाच्या आकाराचे लॉक्स परिधान करते, जेणेकरून केसांना चांगल्याप्रकारे धुता येईल. आठवडय़ात एकदा शॅम्पूचा वापर करते आणि एकाचवेळी शॅम्पूच्या 6 बाटल्या लागतात. मानेवरील ताण कमी करण्यासाठी आणि केसांना जमिनीवर लोळण्यापासून वाचविण्यासाठी त्या केसांना कपडय़ाच्या स्लिंगमध्ये ठेवतात