माडखोल ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल केंद्र शाळा नं १ च्या पदवीधर शिक्षिका सौ रश्मी रवींद्र सावंत यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा माडखोल ग्रामपंचायतीच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रश्मी सावंत यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.शिक्षिका रश्मी सावंत यांनी आदर्श विद्यार्थी घडवितानाच विद्यार्थ्यांना एसटीएस, एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती, नवोदय अशा परीक्षांना बहुमोल मार्गदर्शन करतानाच त्यांना गुणवत्ता प्राप्त करून दिली. याची दखल घेऊन माडखोल ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.रश्मी सावंत यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी कारीवडे ग्रामपंचायत, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, साटम महाराज वाचनालयाच्यावतीनेसन्मानित करण्यात आलेले असून त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी सरपंच शृष्णवी राऊळ, उपसरपंच जीजी राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, गावातील माजी सैनिक, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक तलाठी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.