प्रतिनिधी/ वास्को
शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लबतर्फे वास्कोतील हॉटेल लापाझमध्ये आयोजित कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका अनघा आर्लेकर उपस्थित होत्या. यावेळी आवेर्तन वालिस, रसेल डिसोजा व जैशी तेलीस व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी शिक्षक संतोष खोर्जुवेकर, सामंथा कार्दोझ, अनुजा आर. नाईक, शेख युनूस व नूतन कांदोळकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सौ. आलेंकर यांचे यावेळी शिक्षकांना उध्देशून भाषण झाले.
संतोष खोर्जुवेकर व शेख युनूस यांनी मनोगत व्यक्त केले. जॉयसी तेलीस यांनी आभार मानले.