बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट मंडळ व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रीकेट संघटना आयोजित हुबळीच्या केएससीए क्रिकेट मैदानावर भारत अ व न्यूझीलंड अ सामना 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे.
हुबळी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना दुसऱयांदा आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिज अ व भारत अ यांच्यात सामना झाला होता. 5 सप्टेंबर रोजी भारत अ व न्यूझीलंड अ संघ हुबळीत येणार असून, 8 सप्टेंबरपासून सामन्याला सुरूवात होणार आहे.
भारतीय अ संघात प्रियांक पांचाळ कर्णधारपदी, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, रजत पाटीदार, सर्फराज खान, तिलक वर्मा, के. एस. भरत (यष्टीरक्षक), उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, सौरभ कुमार, राहुल चहर, प्रसिद्ध कृष्णा, उमरान मलिक, मुकेशकुमार, यश दयाल, अरजान नागवासवाला असा संघ आहे.
न्यूझीलंड संघ-टॉम ब्रूस (कर्णधार), रॉबीन ओडोनेल, चार्ड बोवेस, जो कार्टर, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर (यष्टीरक्षक), जेकब डफी, मॅट फिशर, कॅमेरॉन फ्लेचर, बेन लिस्टर, रचिन रविंद्र, मायकेल रिपॉन, सी. एन. सोलीया, लोगन व्हान बीक, जो वॉकर असा संघ आहे.
या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, दोन्ही संघांच्या आगमनानंतर पुढील कार्यक्रम आखण्यात येईल, असे धारवाड विभागिय क्रिकेट संघटनेचे चेअरमन विरेंद्र सौदी व समन्वयक अविनाश पोतदार यांनी कळविले आहे.