सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहर व तालुक्यातील रस्त्यांच्या आजूबाजूला असलेली धोकादायक झाडे प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात तोडावीत. सावंतवाडी शहरात पर्णकुटी विश्रामगृहासमोर जिथे आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी असलेली झाडेही तोडण्यात यावीत. तसेच शहरातील रस्त्यालगतची मोठी झाडेही तोडण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब व मनोज नाईक यांनी केली आहे. यावेळी बंटी पुरोहित उपस्थित होते . श्री परब पुढे म्हणाले मी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. माजी आमदार राजन तेली हे दोन वेळा इथली निवडणूक लढवली आहे . ते आमचे नेते आहेत. या मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत.असेही ते म्हणाले . पक्षाने जरी युतीमध्ये मंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी दिली आणि पक्षाने सांगितले तुम्ही थांबा तरी मी थांबेन असेही ते म्हणाले.