पहिल्याच पंधरवड्यात 25 लाखाचे भागभांडवल जमा
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी अर्बन बँकेच्यावतीने अध्यक्ष सुभाष पणदुरकर आणि संचालक यांनी दिनांक पत्रकार परिषद घेऊन बँकेचे भागभांडवल वाढविण्याच्या दृष्टिने बँकेच्या सभासदाना वृत्तपत्र माध्यमातून जाहीर आवाहन केले होते. आले . त्याला सभासदांनी चांगला प्रतिसाद दिलेला असुन आतापर्यंत रुपये २५,१०,०००/- (अक्षरी रुपये पंचविस लाख दहा हजार मात्र) भागभांडवल बँकेकडे जमा झालेले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भाग भांडवल वाढवून बँकेचा सि.आर.ए.आर. आदर्श करणेबद्दल बँकेला नोटीस दिलेली होती त्याप्रमाणे बँकेवर निर्बंध लादलेले आहेत. त्याला अनुसरून बँकेने रिझर्व्ह बँकेला अॅक्शन प्लान तयार करुन दिलेला आहे. दरमहा पंचविस लाख भागभांडवल जमा करणेची हमी बँकेने दिलेली आहे. त्याप्रमाणे बँकेने सभासदांच्या सहकार्याने व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या मित्रमंडळी व त्यांचे हितचिंतक बँकेचे सभासद यांनी पहिल्या महिन्याचे उद्दीष्ट पुर्तता करण्यासाठी मदत केलेली आहे. दुसऱ्या हप्त्याची रक्कम रुपये पंचविस लाखांची पुर्तता दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे.
आत्ताच झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये ठरल्याप्रमाणे पुढील भागभांडवल वाढविण्याचे नियोजन केलेले असुन संपूर्ण जिल्हातील बँकेच्या नऊ शाखांमध्ये फिरून प्रतिष्ठीत व बँकेचे सध्याचे असलेले सभासद यांना भेटून भागभांडवल गोळा करण्याचे दिपक केसरकर यांची मदत घेऊन युध्दपातळीवर भागभांडवल जमा करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. तरी, सभासद व बँकेचे ग्राहक यांनी घाबरून न जाता आत्तापर्यंत ज्याप्रमाणे विश्वास ठेवलेला आहे त्याचप्रमाणे बँकेवर भविष्यात विश्वास ठेऊन बँकेस सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन पत्रकाव्दारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
सभासदांच्या सहकार्याने हे शक्य झालेले असुन पुन्हा एकदा बँकेच्या सर्व सभासदांना संचालक मंडळाच्या वतीने आवाहन वजा विनंती करणेत येत आहे की, बँकेच्या भागभांडवलामध्ये सभासदांनी जास्तीत जास्त रक्कम गुंतवुन बँकेला पुर्वपदावर आणण्यासाठी सहकार्य करावे असे संचालक मंडळाच्यावतीने मा. अध्यक्ष अॅड. सुभाष गोपाळ पणदूरकर यांनी केलेले आहे.