दि. 24-7-2022 ते 30-7-2022 पर्यंत
मेष
हा आठवडा काहीसा कंटाळवाणा जाऊ शकतो. काही बाबतांमध्ये विनाकारण संशय घ्याल. कौटुंबिक जबाबदाऱया पार पाडताना शब्द जपून वापरावेत. ज्ये÷ांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी गोंधळ उडण्याची शक्मयता आहे त्यामुळे कामांना प्राधान्य देणे गरजेचे असेल. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. काही ठिकाणी अनावश्यक खर्च होऊ शकतो. प्रेमींना उत्साहवर्धक काळ आहे.
वेलदोडा जवळ ठेवावा.
वृषभ
तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा लोक उचलू शकतात. स्वतःचा स्वार्थ साधावा. पैशांच्याबाबतीत गाफिल राहू नये. एखादी व्यक्ती चांगली योजना आहे असे सांगून फसवू शकते किंवा त्यात पैसे वाया जाऊ शकतात. या आठवडय़ात दिवास्वप्ने बघण्यापेक्षा ठोस कृती करणे योग्य ठरेल. कौटुंबिक आनंद प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात रोमान्स वाढेल. मित्रांमध्ये वादावादी होऊ शकते.
पाण्यात चिमूटभर हळद घालून आंघोळ करावी.
मिथुन
तुमच्या विचारांना न पटणारी एखादी गोष्ट करावी लागू शकते. पण त्यातही तुमचा नाईलाज असेल. कामाच्या ठिकाणी वरि÷ांनी जास्तीचे काम लावल्यामुळे नाराज व्हाल. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार करत असताना सावध राहण्याची गरज आहे. जरा कष्टाचे प्रमाण वाढवले तर यश तुमचेच असेल. वैवाहिक जोडीदाराला मदत करत असताना चिडचिड होऊ देऊ नका.
गुलाबाचे अत्तर लावावे.
कर्क
तब्येतीला सांभाळावे लागेल. एखादा जुना विकार डोके वर काढू शकतो. या आठवडय़ामध्ये मानसिक चिंता कमी होतील. घेतलेल्या कामांमध्ये उशिरा का होईना पण यश नक्की मिळेल. कुटुंबातील सदस्यांनी तुमच्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे हा हट्ट सोडावा लागेल. काम करत असताना आपले लक्ष फक्त कामावर ठेवा. नाहीतर कामात चुका होऊ शकतात. प्रेमींनी काहीही लपवू नये.
हिरवा हातरुमाल जवळ ठेवा.
सिंह
या आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी किंवा घरातील सदस्यांवर चिडून बोलणे महागात पडू शकते. काही लोक तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतील. याकरता सावध राहणे गरजेचे आहे. तात्पुरत्या फायद्यापेक्षा नंतर होणारे नुकसान जास्त असेल हे लक्षात ठेवून मोहाला आवर घाला. एखादी प्रिय वस्तु हरवण्याची शक्मयता आहे.
निळे फूल गटारीत सोडावे.
कन्या
कल्पनेपेक्षा वास्तव विचित्र असते याचा अनुभव येण्याची दाट शक्यता आहे. अनपेक्षित धनलाभ किंवा ध्यानीमनी नसताना एखाद्या जवळच्या व्यक्तीची भेट होईल. या आठवडय़ामध्ये कामापेक्षा आरामावर तुमचा भर असेल. काही प्रमाणात मन आळसावलेले असेल. नातेवाईकांच्या घरी एखाद्या समारंभामध्ये भाग घ्याल. त्याकरता खर्चही होऊ शकतो. घरातील डागडुजीकरतासुद्धा खर्च कराल.
धार्मिक स्थळी दूध दान करावे.
तूळ
उत्साहवर्धक असा आठवडा असेल. आर्थिक आवक वाढल्याने खुश व्हाल. घरातील एखाद्या सदस्याच्या मदतीकरता लोकांना भेटावे लागेल किंवा खर्च करावा लागेल. आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींकरता वेळ काढा, त्यांना मदत करा. याचा पुढे जाऊन खूप फायदा होईल. मनातील नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीवरून नाराज व्हाल.
मोगऱयाचे अत्तर लावावे.
वृश्चिक
या आठवडय़ात कोणत्याही प्रकारे हट्ट करून चालणार नाही. कामाच्या ठिकाणी आपलेच खरे हे धोरण बदलावे लागेल. तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना कसा होईल याचा विचार करावा. याने तुमचाच फायदा होईल. आर्थिक व्यवहारांना गती मिळेल. आठवडय़ाच्या शेवटी वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठेतरी जाण्याची योजना आखाल.. मित्र मैत्रिणेंसाठी वेळ न मिळाल्याने मन खट्टू होऊ शकते.
घरी लोबानचा धूर करावा.
धनु
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. काही लोकांच्याबाबतेत कठोर निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण असेल पण त्यातही ज्ये÷ांच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. पैशांच्या बाबतीत हा आठवडा पूर्वीपेक्षा बरा असेल. वैवाहिक जोडीदाराला काही बाबतीत मनवावे लागेल. तब्येतीला सांभाळा.
मनगटावर हिरव्या शाईने जन्मतारीख लिहावी.
मकर
तुमच्या स्वप्नांना किंवा इच्छांना वास्तवात उतरवण्याकरता प्रयत्नांची कास सोडू नये असा संदेश आहे. दैनंदिन कामातून आणि जबाबदाऱयांमधून एखादा ब्रेक घ्यावा असे वाटेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्याकरता प्रयत्न कराल. कामांना गती मिळेल आणि दिशासुद्धा मिळेल. या आठवडय़ामध्ये खर्चाचे प्रमाण वाढू शकते. पण हा खर्च आवश्यक असेल.
तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यानंतर ओली माती कपाळी लावावी.
कुंभ
हा आठवडा देण्याकरता वापरा. म्हणजे ज्यांना सल्ल्याची गरज आहे त्यांना सल्ला द्यावा. ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांना पैशाची मदत करा आणि ज्यांना मानसिक आधाराची गरज आहे त्यांना मानसिक आधार द्या. कुटुंबातील सदस्यांना सांभाळून घ्यावे लागेल. त्यातल्या त्यात ज्ये÷ स्त्रीच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू शकते. छोटय़ा-मोठय़ा अपघातापासून वाचावे लागेल. ठेच लागण्यासारखा प्रकार होऊ शकतो.
काचेची काळी गोटी जवळ ठेवावी.
मीन
या आठवडय़ात कामाच्या व्यापामुळे गोंधळ उडू शकतो. एखाद्या वेळेला कामाकडे दुर्लक्ष झाल्याने चुका होऊन बोलणी खावी लागू शकतात. वरि÷ांना खूश करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. आर्थिक बाजू भक्कम असेल. व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त होतील पण त्या पूर्ण करण्याकरता योग्य व्यक्तीची निवड करणे आवश्यक असेल. प्रेमींनी चुका माफ करणे योग्य ठरेल. केशराचा टिळा लावावा.
टॅरो उपाय
बांदा म्हणजे एखाद्या झाडावरती उगवलेली वनस्पती. मानले जाते की यामध्ये काही विशिष्ट गुण असतात. आंब्याच्या झाडावर उगवलेल्या बांद्याला रविवारी घरी हिरव्या कपडय़ात बांधल्याने समृद्धी येते.