प्रतिनिधी /पणजी
विठ्ठलापूर सांखळी येथील गोव्यातील पहिल्या हरित सरकारी प्राथमिक शाळेचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्या शुक्रवार दि. 3 फ्ब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन होणार आहे.
ही शाळा एक जुनी शाळा असून तिची उभारणी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी केली होती. शाळेची इमारत जुनी झाल्याने त्याजागी नव्याने अत्याधुनिक व हरित शाळा उभारण्याचा संकल्प माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोडला होता.
पर्रीकरांनी बसविली कोनशिला
ऐन आजारपणात देखील या शाळेची कोनशिला त्यांनी पणजीतून बसविली होती. शाळेचे बांधकाम पूर्ण होण्यास प्रत्यक्षात चार वर्षे लागली. केवळ कौलारू अशा या शाळेची उभारणी आता भव्य दिव्य इमारतीमध्ये झाली आहे आणि गोव्यातील ही एक प्रगतशील शाळा आहे. ज्यामध्ये पालक शिक्षक संघटना जबरदस्त सेवा बजावित आहे. पालकांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच आज ही शाळा साकार झाली आहे.
विद्यार्थी वाढल्याने जाग अपुरी
विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्यक्षात सांखळी येथे या शाळेच्या इमारतीची कोनशीला माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या उपस्थितीत बसविली होती. गोव्यातील ही सर्वाधिक पटसंख्या असलेली सरकारी प्राथमिक शाळा असून पालक शिक्षक संघटनेने या शाळेची लोकप्रियता वाढविली. विविध उपक्रम मुलांसाठी राबविल्याने आसपासच्या अनेक गावातून या शाळेमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालकांनी आग्रह धरला. मात्र शाळेजवळ अपुरी जागा असल्याने सर्व मुलांना प्रवेश देता आला नाही.
आता शाळेचे पूर्ण स्वरूप बदलले आहे. तीन मजली इमारत असलेल्या या शाळेमध्ये मुलांसाठी आवश्यक अशा सर्व अत्याधुनिक सेवा, खाली तळमजल्यावर भव्य सभागृह तसेच विविध आकर्षक वर्ग उभारले आहेत.
विठ्ठलापूर सांखळी येथे उद्या दि. 3 फ्sढब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच कारखांडे, पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वर्धमान शेंदूरे तसेच गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष केदार नाईक हे उपस्थित राहणार आहेत.
अशी आहे गोव्यातील पहिली हरित शाळा
ही शाळा तळमजला अधिक 3 मजले अशी इमारत असून एकूण बांधकाम 1823.85 चौ.मी. आहे. यातील तळमजल्यावर आठ खोल्या आहेत. त्यात शिक्षकांसाठी खोली, मुख्याध्यापकांसाठी कक्ष, प्रशासकीय कार्यालय, संगीत वर्गासाठी खोली, प्रत्येक मजल्यावर मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, खेळांचा विभाग, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगमंच, बाजूला ग्रीन रूम्स आहेत. दुसऱ्या मजल्यावर आठ खोल्या तसेच योग व ध्यान धारणेसाठी वर्ग तर तिसऱ्या मजल्यावर वाचनालय, विज्ञानगृह शिवाय खेळासाठी स्वतंत्र जागा आहे.
या शाळेचे शिल्पकार आहेत भास्कर वागळे, अॅड. असोसिएटस् हलवाई इन्फ्ढास्ट्रक्चर कंपनीने बांधकाम केले आहे. एकूण बांधकाम खर्च 4 कोटी ऊपये आहे. गोवा पायाभूत विकास महामंडळातफ्xढ हे बांधकाम झालेले आहे. या बांधकामावर महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संदीप चोडणेकर हे सातत्याने लक्ष ठेवत होते.
विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक विद्यालय
या शाळेचे नाव विठ्ठल रखुमाई सरकारी प्राथमिक विद्यालय विठ्ठलापूर सांखळी असे ठेवण्यात आले आहे. शाळेमध्ये सरस्वतीची मूर्ती आणि स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. गोव्यातली सरकारी पातळीवर ही अशी पहिलीच हरित शाळा असून पंखे व वीज दीव्यांअभावी ही शाळा चालू शकते असे मोकळे वातावरण शाळेत राहील अशी व्यवस्था करणारे बांधकाम व वास्तूरचना आहे.