प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेला कमांडो विंगमधील सुभेदार मेजर शनिवारी सापडला. कॅम्प पोलिसांनी बेळगाव रेल्वेस्थानकावर त्याला ताब्यात घेतले असून रात्री लष्करी अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले.
सूरजितसिंग एच. (वय 47) असे त्याचे नाव आहे. तो पंजाबमधील गुरुदासपूर या जिल्हय़ातील राहणारा असून शनिवार दि. 11 जूनपासून तो बेपत्ता होता. यासंबंधी लष्करी अधिकाऱयांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 11 जून रोजी सायंकाळी सायकलवरून सुरजितसिंग बाजारात आला होता. समादेवी गल्लीत त्याने आपली सायकल उभी केली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. शुक्रवारी सायंकाळी सुरजितसिंग बेळगाव रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती मिळताच कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी रेल्वेस्थानकावर जाऊन त्याला ताब्यात घेतले. रात्री लष्करी अधिकाऱयांकडे सोपविण्यात आले. तो हुबळीहून कोल्हापूरला जात होता.