आत्मविश्वास वाढण्यासह अटेंशन मिळत असल्याचा दावा
न्यूयॉर्क शहरात मागील काही काळापासून पुरुषांमध्ये मिशी ठेवण्याचा प्रकार वाढत चालला आहे. प्रत्यक्षात जे लोक मोठी दाढी राखत होते, ते आता दाढी करताना मिशी हटविण्यास नकार देत आहेत. याचमुळे सलूनमध्ये देखील लोक आता मिशी काढून टाकणे टाळत आहेत.
मिशी राखल्याने आमचे कौतुक होत आहे. तसेच आमची मिशी लोकांचे लक्ष वेधून घेत असल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे. मिशीमुळे आमचे व्यक्तिमत्त्व व्यक्त होत असल्याचे लोक सांगत आहेत.
टक्कल पडलेल्या पुरुषांना मिशी एकप्रकारे गेमचेंजर वाटते असे उद्गार मेकअप स्टायलिस्ट निकी ऑस्टिन यांनी काढले आहेत. माझ्या मिशीमुळे इतर लोकांचे लक्ष वेधले गेल्याचे पाहून मी चकित झालो. त्यानंतर मी पूर्ण मिशी राखण्यास सुरुवात केल्याचे रिगवूडचे आर्टिस्ट क्रिस्टीन इलुजी यांनी सांगितले आहे.
व्हँकूरमध्ये मेटी कॉनरेडचे अनेक सलून्स आहेत. ते एक युट्यूब चॅनेलही चालवितात जे अत्यंत लोकप्रिय आहे जर मी मिशी राखली नाही तर लोकांचा वॉव फॅक्टर संपतो असे त्यांचे सांगणे आहे.
माइक ब्ल्यू हे 6 महिन्यांपासून मिशी राखत आहेत. माझ्या पत्नीने मिशीचे कौतुक केल्यावर मी लुकच बदलला. मी दोन मुलांचा बाप आहे. मिशीमुळे मला गंभीर पिता असल्याची जाणीव होत असल्याचा दावा माइक यांनी केला आहे.
कोरोना महामारीच्या 7 महिन्यांच्या दीर्घ लॉकडाउनदरम्यान मी मिशी वाढविली होती. ज्या लोकांना मिशा असतात त्यांच्यात अधिक आत्मविश्वास असतो असे मी पाहिले असल्याचे उद्गार 27 वर्षीय अभिनेता जिम्मी ब्रिवरने काढले आहेत.