हरियाणातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल ः ‘फायरमॅन’वर कौतुकाचा वर्षाव
पानिपत / वृत्तसंस्था
हरियाणाच्या पानिपत जिह्यातील अग्निशमन विभागात तैनात असलेल्या सुनील मेहला या जवानाने तिरंगा वाचविण्यासाठी केलेली प्रचंड धडपड व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. शहरातील भारतनगर येथील सूतगिरणीला मंगळवारी भीषण आग लागली. आगीच्या वेळी मिलच्या मुख्य इमारतीच्या छतावर तिरंगा फडकत होता. तितक्मयात सुनीलची नजर तिरंग्यावर पडली. जीवाची पर्वा न करता तो छतावर चढला आणि थोडय़ाच वेळात तिरंगा सुखरूप खाली आणून शेजारच्या कारखान्यात आदराने ठेवला. सुनील मेहला या ‘फायरमॅन’ जवानाचे या कार्याबद्दल प्रचंड कौतुक होत आहे. या अत्यंत कठीण परिस्थितीत केलेल्या कार्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील याने ‘मेरी जान तिरंगा है’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हरियाणातील पानिपत शहरातील भारतनगर येथील सूतगिरणीला मंगळवारी संशयास्पद परिस्थितीत आग लागली. आग एवढी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण इमारत अग्नितांडवात रुपांतरित झाली. या आगीसंबंधीची माहिती दिल्यानंतर तासाभरात आग आटोक्मयात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने आगीने भीषण रूप धारण केले होते. या जाळपोळीत 5 कोटींचे नुकसान झाल्याचे मालकाचे म्हणणे आहे. सदर सूतगिरणी मदन गोयल यांच्या मालकीची आहे. मंगळवारी दुपारी जेवणाच्या वेळेत मिलमध्ये संशयास्पद परिस्थितीत आग लागली. धुराचे लोट वाढत असल्याचे पाहून कर्मचाऱयांमध्ये चेंगराचेंगरी झाली. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुताला लागलेली आग नियंत्रणात आणणे अवघड झाले होते.