ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांना व्हॉटस्ऍपवर तुमचाही दाभोळकर करू, अशी धमकी अज्ञाताने दिली आहे. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी मानव यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
मध्यप्रदेशातील बागेश्वर धाममधील धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज आले आहेत. त्यामध्ये आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु, असे म्हटले आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसात अंनिसकडून तक्रार दाखल करण्यात आली असून, नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. श्याम मानव सध्या नागपूरच्या रवी भवन येथील कॉटेजमध्ये मुक्कामी असून, त्यांच्या कॉटेज बाहेर आणखी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अधिक वाचा : काँग्रेसचा राज्यात पुन्हा स्वबळाचा नारा