केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. सहकारी संस्थांसाठी सरकार राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करत आहे. 63 हजार प्राथमिक कृषी कर्ज समित्यांच्यासंगणकीकरणासाठी केंद्रपुरस्कृत प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे शाह यांनी म्हटले आहे. लोकसभेचे सदस्य कोथा प्रभाकर रेड्डी यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल शाह यांनी ही माहिती दिली आहे.
प्राथमिक कृषी कर्ज समित्यांना बहुउद्देशीय जिवंत व्यावसायिक स्वरुप प्राप्त करून देण्यासाठी राज्य सरकार, राष्ट्रीय सहकार संघ आणि अन्य सर्व घटकांशी विचारविनिमय करून प्रारुम आदर्श उपनियम तयार केले जात आहेत. समित्यांच्या कामकाजात व्यावसायिकता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी या प्रारुप आदर्श उपनियमांमध्ये विविध तरतुदी सामील करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले आहे.