प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील गामा इंम्पॅक्टमध्ये बारावी विज्ञान विषयात शिकवणी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या शिकवणी वर्गातील वीस विद्यार्थ्यांना 80 टक्के गुण प्राप्त झाले आहे. सार्थक वझे याला सर्वाधिक 93.8 टक्के गुण मिळाले.
नेहा गावडे 90 टक्के, क्रिस्टल फर्नांडिस 89 टक्के, विबुशा गावडे 88.5 टक्के, पार्थ कामत 88 टक्के, मैथिली चव्हाण 87.7 टक्के, अंगद सावकार 86 टक्के, जहारा बेग 85.5 टक्के, रोशन यादव 84.7 टक्के, मंजुष गावणेकर 84 टक्के, आर्या धुमस्कर 84 टक्के, राजीवकुमार नाईक 84 टक्के, साईश प्रियोळकर 83.4 टक्के, वेदांग कामत 81.7 टक्के, सिद्धी शेणवी 81.3 टक्के, दिशान कुंभार 80.8 टक्के, ऋतुजा गावडे 80 टक्के, आर्यन नाईक 80 टक्के, गायत्री नाईक 80 टक्के, कांचन नुग्गल 80 टक्के या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.
गामा इंम्पॅक्टच्या मनीषा नाईक यांनी दर्जेदार निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गेल्या 11 वर्षांपासून गोवा शालान्त मंडळ, जेईई मेन्स, नीट व जीसीईटी परीक्षेत गामा इंम्पॅक्टमध्ये शिकवणी घेतलेले विद्यार्थी नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत.
विद्यार्थ्यांना तज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. वरद बिल्डिंग, दुसरा मजला शांतीनगर फोंडा येथे अकरावी विज्ञान विषयाच्या शिकवणीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.