63 वर्षीय नागार्जुनची असणार नायिका
तेलगू स्टार नागार्जुन यांच्या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत असतात. 63 वर्षीय नागार्जुन आता 26 वर्षीय मॉडेल-अभिनेत्री मानसा वाराणसीसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहेत.
फेमिना मिस इंडिया 2020 ची विजेती राहिलेली मानसा चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास तयार आहे. मानसाला नागार्जुन यांच्या चित्रपटाद्वारे पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. नागार्जुन या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहेत. या तेलगू चित्रपटात नागार्जुन यांची एक भूमिका तरुणाची तर दुसरी वृद्धाची असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसन्ना कुमार करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू महिन्यातच सुरू होणार आहे.
मानसा वाराणसी ही मॉडेल असण्यासह इंजिनियर तसेच सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. मानसाने प्यूर्टो रिकोमध्sय झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते. मानसा ही भरतनाटय़ममध्ये पारंगत असून तिला साइन लँग्वेज देखील अवगत असल्याचे समजते.