पालक खुश, शाळाच्या पहिल्या दिवसासाठी विद्यार्थी उत्साही मुडमध्ये
फोंडा : प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणांसाठी पैशाची पर्वा कधी करीत नसतो. आपल्या पाल्याच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात नेहमीच नव्या नवलाईने व्हावी असा त्dयाचा नेहमी होरा असतो. त्dयासाठी पालकही मुलांसाठी नवनवीन शालेय साहित्याची खरेदी करत असतात. काल रविवारी फोंड्यातही गोवा बागायतदारच्या शालेय साहित्य उपलब्ध करण्याच्या दालनात बच्चे कंपनीने आपल्या पालकांसह खरेदीसाठी गर्दी केली होती. नवी पुस्तके, पाटी, दफ्तर, वह्या, पेन्सिल, पेन, कंपास, पाण्dयाची बाटली, शालेय बुट, टिफीनसाठी विविध रंगाचे कार्टुनची छबी असलेले डबे खरेदीवर मुले अडून बसलेली आढळली. सरकारी शाळांना गणवेश मोफत मिळत असलातरी दुसऱ्या दिवसापासून शालेय वर्गाला सुरूवात होत असल्यामुळे काही पालकांनी बाजारात रेडीमेड उपलब्ध असणारे शालेय गणवेशही खरेदी केला होता. शालेय दफ्तरांचा भार याचा विचार करीत पालकही चांगल्या कंपनीचे बॅग घेणे पसंद करतात. सद्या बॅगाचा दरही बराच वाढलेला असून रू. 500 ते रू. 1200 पर्यतच्या बॅगाही पालक उत्साहात खरेदी करण्याचा मुडमध्ये होते. पावसाळ्यात लागणाऱ्या छत्र्या व रेनकोट खरेदीसाठीही झुंबड उडाली होती. सद्या सरकारी स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके पुरविण्यात येत असल्यामुळे पालकांनी केवळ नाममात्र सहा वह्dया घेण्यावर भर दिलेला आहे. यासह अन्य काही गरजेंच्या वस्तू वर्षाच्या सुरवातीलाच खरेदी करण्यावर पालकांनी जोर दिला आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी काल विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होती.