पंढरपूरला जाताना भाविकांचे झाले होते निधन
प्रतिनिधी /बेळगाव
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाताना सांगोला येथे कार उलटून बेळगाव येथील दोन भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या भाविकांना रविवारी भांदूर गल्ली अनगोळ येथील हनुमान युवक मंडळाच्यावतीने शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते छायाचित्रकार राजू शिवाजी शिंदोळकर व परशराम झंगरुचे यांच्या प्रतिमेचे हनुमान व्यायाम शाळेतर्फे पूजन करण्यात आले. माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, केदारी जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. गल्लीतील पंच कमिटीतील सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कोकसेकर, केदारी जाधव, भावेश बिर्जे आदींनी यावेळी शोक व्यक्त केला. युवकांनी रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.