गीतगायन स्पर्धेत मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूल तर नृत्यमध्ये दैवज्ञ इंग्लिश शाळा प्रथम
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी बेळगाव रिजनलतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी वंदे मातरम् समूह गीतगायन व नृत्य स्पर्धा दि. 29 ऑगस्ट रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे उत्साहात पार पडल्या. लोकमान्यचे बेळगाव विभागीय व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून लोकमान्यच्या कार्याची माहिती दिली.स्पर्धेत शहरातील 20 शाळांमधून 40 गटांनी म्हणजेच 403 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. 26 गटांनी समूह गायन तर 14 गटांनी समूह नृत्य सादर केले. गायन स्पर्धेत मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलने प्रथम, मराठी विद्यानिकेतन हायर प्रायमरीने द्वितीय तर एम. व्ही. हेरवाडकर शाळेने तृतीय क्रमांक पटकावला.
मराठी विद्यानिकेतन उत्कृष्ट शाळा
समूह नृत्य स्पर्धेत कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश माध्यम शाळेने प्रथम, प्रेसियस ब्लॉसमने द्वितीय व मराठी विद्यानिकेतनने तृतीय क्रमांक पटकाविला. गायन व नृत्य या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून मराठी विद्यानिकेतन हायर प्रायमरी शाळेने बक्षीस पटकाविले. परीक्षक म्हणून पूनम बेळगावकर व तेजस्विनी दळवी यांनी गायन स्पर्धेसाठी तर नृत्य स्पर्धेसाठी संदीप किणेकर व दीक्षा जोशी यांनी काम पाहिले. मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन छाया दोडमनी यांनी केले. स्पर्धेसाठी सर्व शाखांचे व्यवस्थापक, कर्मचारी, बेळगाव विभागीय कार्यालयातील अधिकारी, मार्केटिंग मॅनेजर यांनी उपस्थित राहून नियोजनाची बाजू सांभाळली.