प्रतिनिधी /पणजी
अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि संघप्रदेश (एजीएमयूटी) केडरमधील विविध आयएएस अधिकाऱयांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. त्यात गोव्यातील चार अधिकाऱयांचा समावेश आहे.
त्यामधील संजीत रॉड्रिगीश यांची अरुणाचल प्रदेश, संजीव गडेकर यांची जम्मू काश्मीर, यतिंद्र मराळकर यांची लडाखमध्ये तर प्रसन्न आचार्य यांची मिझोराम येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱयांनी त्यांच्या संबंधित बदली ठिकाणी त्वरित रुजू व्हावे असे आदेशात म्हटले आहे.