बेळगाव : बेळगावमधील तीन जोडपी बेळगाव ते लडाख असा खडतर प्रवास दुचाकीवरून करणार आहेत. अंदाजे 2 हजार 600 कि.मी.चा हा प्रवास असून, ही तीनही जोडपी हा खडतर प्रवास करणार आहेत.
बेळगावचे शिवंकर खडबडी व त्यांच्या पत्नी विजया खडबडी, उत्तम गुर्जर व त्यांच्या पत्नी लता गुर्जर, राहुल व त्यांच्या पत्नी स्नेहा मंगण्णावर हे सहाजण लडाख प्रवास करणार आहेत. खडबडी हे 500 सीसी रॉयल इन्फिल्ड थंडरबर्ड, मंगण्णावर हे रॉयल इन्फिल्ड थंडरबर्ड 350 सीसी तर गुर्जर हे 600 सीसी दुचाकीने हा प्रवास करणार आहेत. रविवारी त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराने त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.