भारतात द्यावे लागणार 719 रुपये ः अमेरिकेत भारतापेक्षा कमी शुल्क आकारणी
नवी दिल्लीः
सोशल मीडिया टdिवटर या प्लॅटफॉर्मवर ब्लू टिकसाठी भारतामधील ग्राहकांना 719 रुपये मोजावे लागतील. हे तुमच्या स्मार्टफोन आणि ब्रॉडबँड बिलापेक्षा जास्त आहे. ट्विटर भारतात सशुल्क ब्लू टिक प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत यासाठी कंपनी दरमहा आठ डॉलर्स आकारत आहे.
मात्र भारतात यासाठी युजर्सकडून जास्त शुल्क आकारले जात आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, भारतातील काही लोकांना ब्लू टिक ऍक्सेस मिळू लागला आहे. यासाठी यूजर्सकडून दरमहा 719 रुपये आकारले जात आहेत जे 8.9 डॉलर्स इतके आहे.
ट्विटरच्या भारतातील ऑफरचा क्रीनशॉट अनेकांनी शेअर केला आहे. ट्विटरचे मालक झाल्यानंतर, जगातील सर्वात मोठे उद्योगपती एलॉन मस्क यांनी 1 नोव्हेंबर रोजी जाहीर केले की ब्लू टिकशी संबंधित सबक्रिप्शन पॅक हा देशाच्या चलनमूल्याच्या समानतेनुसार निर्धारित केला जाईल.
ट्विटर ब्लू सदस्यांना प्रत्युत्तरे, उल्लेख आणि शोधांमध्ये प्राधान्य मिळेल आणि ते मोठे व्हिडिओ पोस्ट करण्यास सक्षम असतील. त्यांना अर्ध्या जाहिराती देखील दिसतील आणि त्यांना निवडक लेखांवर पेवॉल बायपास करण्याचा पर्याय असेल. ट्विटर ब्लू हे यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमधील ऍपल वापरकर्त्यांसाठी आठ डॉलर सबक्रिप्शनसह लॉन्च केले. याआधी मस्क यांनी सांगितले होते की, ही सेवा एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत आहे.